Thursday 25 September 2014

विज्ञान खेळणी

खेळण्यांचा जादुगर-अरविंद गुप्ता 


 शिक्षण क्षॆत्रातील अफलातून व्यक्तिमत्व , ज्यांना 'खेळण्यांचा जादुगर' या नावाने ओळखल्या जाते. कानपूर आय.आय. टी. पदविधर असलेल्या या अभियंत्याचे मन जास्त शिक्षण क्षॆत्रातच रमले. काही वर्षे टेल्कोमध्ये काम केल्यानंर 1978 साली सुट्टी घेऊन मध्यप्रदेशातील होशंगाबाद या आदिवासी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळात जाऊन तळागाळात विज्ञान शिकवण्याचे काम कसे चालते याचा अभ्यिस केला. याच काळात त्यांनी परिसरात सहज उपलब्ध असणार-या साहित्यापासून  शैक्षिणक साहित्य तयार केले.

 
    अरविंद गुप्तांनी मुलांना विज्ञानातील संबोध-संकल्पना सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजण्यासाठी शेकडो विज्ञान खेळण्यांची व शैक्षणिक साहित्याची णिर्मीती केली. त्यांच्या या योगदानिची दखल अनेक आंतराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. जसे युनीसेफ, युनेस्को, इंटरनँशनल टाँय रिसर्च असोसिएशन इ.
गुप्तांची विज्ञान खेळणी, शैक्षणिक साहित्य  तयार करण्याचे शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

http://arvindguptatoys.com

अरविंद गुप्ता यांच्या विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

No comments:

Post a Comment